सोनेगाव येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : आज बुधवार 30 जून रोजी दुपारी 2:30 ते 3:00 वाजता दरम्यान घुग्घुस येथून जवळच असलेल्या सोनेगाव येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

आज दुपारी सोनेगाव येथील शेतकरी गोवर्धन किसन गोहणे हा नेहमी प्रमाणे आपले शेतीचे काम करण्यासाठी शेतात गेला होता परंतु दुपारी विजेच्या कडाक्यासह मुसळधार पाऊस पडला शेतात काम करीत असतानाच गोवर्धनच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह शेतातून गावात आणला गोवर्धन किसन गोहणे शेतकऱ्याच्या मृत्यूने सोनेगावात शोककळा पसरली आहे.