चंद्रपूर : जिल्ह्यातील चंद्रपूर तालुक्याचे भाजपा किसान मोर्चा चे तालुका अध्यक्षांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी (30जून) ला समोर आली आहे. राजेश रामकृष्ण ताजणे (वय 52) असे मृताचे नाव आहे.
घुग्घूस पासून जवळच असलेल्या उसगाव येथील ते रहिवाशी होते. आज बुधवारी 30 जून रोजी राजेश रामकृष्ण ताजने (52) यांनी आपले स्वत:चे घरी पहाटे 4 वाजता दरम्यान विषारी द्रव्य प्राशन केले. सदर घटना लक्षात येताच त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचा मृतदेह दुपारी उसगाव येथे आणण्यात आला व अंत्यविधी करण्यात आला. ते भाजपाच्या राजकारणात सक्रिय होते भाजपा किसान मोर्चाचे ते तालुका अध्यक्ष होते. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. वृत्तलिहेस्तोवर घुग्घुस पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल झाला नव्हता.