प्रसिद्धि नको पाणी हवे, भाजपचे नगरसेवक सुभाष कासनगोटुवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : शहरात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. नागरिक पाण्यासाठी भटकत आहे. मात्र, त्यांची समस्या सोडविण्याऐवजी मनपाला प्रसिदधीचा हव्यास सुटला आहे. त्यामुळे आधी पाणीपप्रश्न सोडवा अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुभाष कासनगोटुवार यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीने स्वपक्षच अडचणीत सापडला आहे.

चोवीस लाख रूपयांचे प्रसिद्धीचे कंत्राटावर आता भाजपचे नगरसेवक सुद्धा उघडपणे विरोध करायला लागले. पक्षाचे शहर महामंत्री आणि मनपाचे नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी याच ‘मुद्यावरून महापौर राखी कंचर्लावार यांना घराचा अहेर दिला. आधी शहरातील लोकांना पाणी पाजा ‘मग प्रसिद्धी करा , असे पत्रच त्यांनी लिहीले आहे. या पत्रावरून भाजपच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मनपातील अधिकारी आणि नगरसेवकांचा विरोध डावलून महापौरांनी नागपूर येथील एका कंपनीला मनपाच्या प्रसिद्धीचे २४ लाख रूपयांचे कंत्राट दिले आहे. या कंत्राटाला अजुनही अधिकाऱ्यांचा विरोध आहे. मनपाची आर्थिक स्थिती खराब असताना आणि कोरोनाचे दिवस असताना प्रसिद्धीसाठी एवढी रक्कम खर्च करण्यावरून नगरसेवक संतप्त आहे. विरोधी पक्षाचे नगरसेवक यांचा उघडपणे विरोध करीत आहे. आता भाजपच्या नगरसेवकांनी याच मुद्यावरून संताप व्यक्त केला. शहरात पाणी टंचाई आहे. लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टँकरसाठी मनपाकडे पैसे नाही. दुसरीकडे २४ लाख रूपये मनपा प्रसिद्धीवर खर्च करत आहे, असा आरोप सुभाष कासनगोट्टूवार यांनी केला आहे. त्याच्या या पत्राने भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.