चंद्रपूर शहरातील पाणी टंचाई विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामूळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे या मागणी करिता आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करत मनपा समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सदर मागणी बाबतचे निवेदनही मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक *कलाकार मल्लारप, यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जितेश कुळमेथे, विश्वजित सहा, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर प्रमूख सलीम शेख, राशीद हुसैन, हेरनन जोसेफ, नितीन साहा, तिरुपती कलगुरुवार, राम मेंढे, कालिदास धामनगे, अबरार सय्यद, गोपी मित्रा, चंद्रशेखर देशमुख, कैलास धायगुडे, महेश गहुकर, सुधीर माजरे, आशा देशमुख, वैशाली रामटेके* यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

.चंद्रपूर महानगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामूळे दर वर्षीच्या उन्हाळ्यात चंद्रपूर करांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाच्या उन्हाळ्यातही हिच परिस्थिती उद्भवली असून नियमीत पाणी पूरवठा होत नसल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच भटकंती करावी लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये मनपा प्रती रोष आहे. काही भागात महानगर पालिकेच्या वतीने पाण्याच्या टॅकरद्वारे पाणी पूरवठा करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. मात्र सदर टॅंकर येताच नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचीही शक्यता निर्माण होत आहे. संपूर्ण शहरासह बाबूपेठ, भिवापूर, रहैमतनगर, बगडखिडकी, इंडस्ट्रीयल वार्ड, वडगाव वार्ड या भागात पाण्याची अधिक टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामूळे पाणी पूरवठा सुरळीत करुन नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी द्या या मागणीसाठी आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जोरदार निदर्षने करण्यात पाणी पूरवठा बाबत मनपाच्या धोराणांचा निषेध करण्यात आला. यावेळी एका शिष्टमंडळाने उपायुक्त विशाल वाघ यांची भेट घेत सदर विषयावर सविस्तर चर्चा केली असून पाणी पूरवठा नियमीत सुरु न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही दिला आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.