चंद्रपूर : आ. किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या जनतेमध्ये विविध सामाजीक माध्यमाचा वापर करत तसेच धरणे प्रदर्शन मोर्चा रॅली द्वारा वारंवार हा आपला जिल्हा आहे, हा विज उत्पादक जिल्हा आहे. विज उत्पादकासाठी आपण जागा पाणी देतो आणि चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्र चंद्रपूर जिल्हयाचे जल वायु प्रदुषन होते याच्यामुळे चंद्रपूर वासीयांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. आपल्याकडे ईतर जिल्हयाच्या तुलनेत लोकांना विविध आजार होत असतात. संपुर्ण देशात चंद्रपूर जिल्हा सर्वात प्रदुषित जिल्हा बनला आहे. अशी स्थिती असतांना सुद्धा आपल्याला मुंबईच्या दराने वीज बिल भरावे लागते. हा अन्याय आहे. विज उत्पादक जिल्हा म्हणुन आपल्याला 200 युनिट विज मोफत मिळावी अशी मागणी निवडणुकीच्या अगोदर साहेबांनी वेळोवेळी केली आहे. निवडणुकीत लोकांना आश्वासन दिले. किशोर जोरगेवार यांना हक्काचे 200 युनिटसाठी मत द्या.लोकांनी विश्वास ठेऊन मतदान केले. परंतु निवडणुक झाल्यावर आपल्या शब्दावरून आमदार किशोर जोरगेवार पाठ फिरवितांना दिसत आहे, विधान सभा 2019 चंद्रपूर निवडणुकीत किशोर जोरगेवार द्वारा 200 युनिट फ्री देण्याचे आश्वासन विधानसभेच्या जनतेला आकर्षित करून विधान सभा निवडणुकीमध्ये स्वतःचा विधायक होण्याचे
स्वप्न पुर्ण केले. तसेच या विषया अंतर्गत अनेकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन मिडियाचा गैर वापर करण्यात आला. कोविड महामारीच्या काळात आमदार साहेबांनी केलेल्या घोषणाप्रमाणे 200 युनिट मोफत विज कधी मिळणार ? हा प्रश्न जनतेद्वारा विचारला जात आहे. तर जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा घेवुन समाजवादी पार्टी तर्फे 2/12/2020 रोजी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयास भेट देऊन जनतेचा प्रश्न मांडण्यात आला. तर आमदार साहेबांद्वारा या प्रश्नांचे योग्य उत्तर मिळाले नाही.
म्हणुन आज दिनांक 6/1/2021 रोजी आमदार साहेबांना आश्वासने दिल्यानंतर गाठ झोप लागली असुन त्यांना जाग यावी म्हणुन समाजवादी पार्टीचे जिल्हाअध्यक्षा सोहेल शेख व शहर अध्यक्ष तनशिल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयासमोर डफली वाजवुन आमदारांना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आले. तसेच समाजवादी पक्षातर्फे आ, किशोर जोरगेवार यांनी दिल्लीच्या पार्श्वभुमिवर चंद्रपूरमध्ये सुद्धा जनतेच्या हक्काचे 200 युनिट मोफत विजेच्या आश्वासनाची पुर्ती करावी अशी मागणी करण्यात आली.