घुग्घुस : कोरोना काळातील ताळेबंदी, संचारबंदीत सर्व रोजगार, व्यापार, मजुरी पूर्णतः बंद झाली होती. छोटे व्यापारी, रोज मजदूरी करणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. या संकटाच्या काळात घुग्घुस येथील हेलपिंग हँडस या टीम तर्फे संपूर्ण घुग्घुस परिसरातील नागरिकांना घरपोच अनाजकीट वितरित करण्यात आली.
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहचविण्यात आले.
ऑटो, डगगा, सलून, हात रिक्षाचालक, पेपर वितरक, सर्व दुर्बळ घटकांना शक्यतोपरी मदद पोहचवली त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनी न्यू लाईफ चॅरिटेबल ट्रस्ट तथा आयटक संघटनेच्या वतीने टेम्पो क्लब घुग्घुस येथे भव्य कार्यक्रमात पुष्पगुच्छ, शिल्ड, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळीस हेलपिंग हँडसचे पदाधिकारी राजूरेड्डी, सैय्यद अनवर, सचिन कोंडावार, अजय उपाध्ये, बालकिशन कुलसंगे, आरिफ शेख, शहजाद शेख, राजू पोल, सचिन नागपुरे, रंजित राखुडे, किरण पुरेल्ली, अंकुश सपाटे,देवानंद ठाकरे,संजय कोवे,
यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक हृदय अड्डुर, जियाउल्लाह खान, हृदय अडडुर,प्रिया अंथोनी, प्रकाश रामील्ला यांनी केले.