• सचिनची जंगल सफारी; ताडोबात लयभारी
• मास्टर ब्लास्टर परिवारासहीत ताडोबातून परतला
चंद्रपूर : देशभरात पर्यटकांकरिता ताडोबा अभयारण्य वाघांचे हमखास होत असलेल्या दर्शनामुळे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यामुळेच ताडोबात जंगल सफारीकरीता (वाघाच्या दर्शनकरिता) सेलिब्रेटींची हजेरी लागत आहे. नुकतेच्या चार दिवसाच्या ताडोबा जंगल सफारीकरिता आलेल्या सचिन तेंडूलकर यांना पाचही दिवस सफारी दरम्यान वाघ, वाघीणींचे दर्शन झाले. त्यापैकी झरणी, छोटी तारा, झुनाबाईची त्यांना विशेष भूरळ पडली. आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी परिवारासहीत चार दिवसाच्या मुक्कामानंतर ताडोबा अभयारण्याचा निरोप घेतला आहे.
मागील वर्षी याचवेळी सचिन येथे जंगल सफारीसाठी आला होता. तब्ब्ल वर्षभरापूर्वी तो यावेळी 24 जानेवारी 2021 ला ताडोबातील चिमूर तालुक्यात बांबूरिसोर्ट मध्ये दुपारच्या सुमारास आपल्या परिवारासहीत पोहचला. तब्बल चार दिवसाच्या मुक्कामात त्यांनी आपल्या परिवारासहीत वाघ वाघीणींचे बछड्यांसह दर्शन झाले. शिवाय इतर बिबट व शाकाहारी प्राणीही पाहता आले. पहिल्याच दिवशी ताडोबात आगमनानंतर सचिन यांनी, दुपारी अलीझंझा प्रवेशद्वारातून सफारी केली.
त्यावेळी झरणी नावाच्या वाघीणीचे बछड्यासहीत दर्शन घडले. शिवाय एक बिबट पहता आले. दुस-या दिवशी 25 जानेवारी ला मदनापूर प्रवेशद्वारातून सफारी करण्यात आली. त्यावेळी पिल्लासह आणि एका वाघासह असेलेली झुणाबाईचे दर्शन झाले. 26 जानेवारीला बेलारा या प्रवेशद्वाराने सफारी पार पडली. यावेळी एका वाघाने दर्शन दिले. काल 27 जानेवारी आणि आज शेवटच्या दिवशी छोटी तारा नावाच्या वाघीनेचे दोन्ही दिवस दर्शन झाले. एकंदरीत चार दिवसाच्या मुक्कामी झरणी, छोटी तारा, झुनाबाईची भूरळ सचिन आणि त्यांच्या परिवाराराला पडलेली दिसली.
आज गुरूवारी 28 जानेवारीला सचिन यांचा जंगल सफारीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळची सफारी केली. वाघीणीचे दर्शन झाले. त्यानंतर मास्टर ब्लास्टरी सचिन तेंडूलकर यांनी ताडोबा अभयारण्याचा निरोप घेतला. तत्पूर्वी बांबु रिसोर्ट मधील सफारी कर्मचारी यांना बायबाय करून ताडोबातून दुपारी दीड वाजताचे सुमारास नागपूर मार्गे मुंबईला परतला. चार दिवसाच्या जंगल सफारीत सचिनला वाघ वाघीणींच्या दर्शनाची भूरळ अनुभवता आली तर पर्यटक आणि चाहत्यांना सचिनच्या ताडोबा आगमनाचा आनंद द्विगुणीत करता आला.