घुग्घुस : संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा धडा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी गोळी झाडून हत्या केली होती.
घुग्घुस काँग्रेस तर्फे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता यांनी संपूर्ण जगाला शांतीचे मार्ग दाखविले मात्र आज आपल्या देशात सातत्याने शांती व अहिंसेला तिलांजली दिल्या जात आहे.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मागील दोन महिन्यां पासून केंद्र शासनाच्या तीन नवीन कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर शांततेपुर्वक आंदोलन करीत आहे. हे काळे कायदे परत घ्या अशी मागणी करीत आहे.
शंभराच्यावर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.मात्र केंद्र शासन शेतकऱ्यांचा आंदोलन दडपून टाकण्या करिता दडपशाही करीत आहे. शेतकऱ्यांना देशद्रोही आतंकवादी संबोधले जात आहे.
हे अत्यन्त क्लेशदायक असून शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठींबा दर्शविण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी यांनी हातात पाटी घेवून शेतकरी विधेयक परत घ्या ” अशी मागणी केली याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजुरेड्डी, रोशन पचारे (किसान सेल जिल्हाध्यक्ष) पवन आगदारी (एस्सी सेल जिल्हाध्यक्ष) शामराव बोबडे, सैय्यद अनवर (कामगार नेते) तौफिक शेख (युवक काँग्रेस अध्यक्ष) दिलीप पित्तलवार (राष्ट्रवादी युवक अध्यक्ष) अजय उपाध्ये, कल्याण सोदारी,दीपक पेंदोर, बालकिशन कुळसंगे,प्रेमानंद जोगी, रोशन दंतलवार,देव भंडारी, साहिल सैय्यद, सुनील पाटील, रमेश रुद्रारप,संपत कोंकटी, व अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.