वाचून हैराण व्हाल असा 9 कोटी 51 लाखांचा गैरव्यवहार
चंद्रपूर : पंचायत राज समिती (PRC)च्या 29 आमदारांची टीम 9 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात दाखल होत असून, स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येत असलेल्या पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यामध्ये करण्यात आलेल्या 171 घोटाळे व भ्रष्टाचार प्रकरणाचा छळा लावण्यात येणार आहे. यामुळे अधिकारी, कर्मचारी, व नेत्यांची धावपळ सुरू झालेली आहे.
गेल्या काळातच PRC ची टीम जिल्ह्यात यायला हवी होती. मात्र भाजप सत्तेत असतांनी ही टीम चंद्रपुरात येऊ शकली नाही. मात्र, आता तब्बल 14 वर्षानंतर ही टीम जिल्ह्यात येत आहे. 171 घोटाळ्याची चौकशी करणार आहे. यामध्ये घुग्घुस ग्रामपंचायत मधील 9 कोटी 51 लाख रुपयांच्या घोटाळायांचा प्रकरण ही समाविष्ट आहे. चंद्रपूर तालुक्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या व नुकताच नगरपरिषद झालेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीत देवराव विठोबा भोंगळे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर हे 01 एप्रिल 2001 ते 09 सप्टेंबर 2005 या कालावधीत सरपंच पदावर होते.
या कार्यकाळातील खर्चाचे 2009 मध्ये स्थानिक लेखा विभागाचे उप – मुख्य लेखा परीक्षकांनी लेख परीक्षण केले या लेखा परीक्षणात 9 कोटी 51 लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला. यानंतर 31 जानेवारी 2009 ला आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अहवाल लेखा परिक्षकांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे सादर केला. याप्रकरणात स्वतः लेखा परिक्षकाने उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती.
अंकेक्षण अहवालात आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आल्या नंतर याप्रकरणी दोन सदस्यी समिती नेमण्यात आली व या समितीला एक महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करायचा होता.
मात्र, चौकशीला सुरुवात झालीच नाही कारण देवराव भोंगळे हे त्यावेळीस जिल्हापरिषदेचे अध्यक्ष होते. दोन सदस्यांनी हे प्रकरण खूप मोठे असून आम्ही चौकशी करण्यास असमर्थ असून, आम्ही या प्रकरणातून माघार घेत आहो अशी भूमिका घेतली. याप्रकरणाला घेवून जिल्हापरिषद सदस्य सतीश वारजूरकर व विनोद अहिरकर यांनी न्यायालयात केस देखील टाकली होती.
हे प्रकरण परत एकदा उघडल्या जाणार असल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह दिसू लागले आहेत.
आता या चौकशीत काय निष्पन्न होईल हे येणारा काळच सांगेल ?