अप्पर जिल्हाधीकारी कार्यालय पंधरा दिवसात सुरु करा

0
17

• अन्यथा चिमूर नगर परिषदेच्या निवडणूकीवर बहीष्कार
• चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीच्या बैठकीत सुर
• मुख्यमंत्री व महसुल मंत्री यांना निवेदण

चंद्रपूर : चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणे व चिमूर अप्पर जिल्हाधीकारी कार्यालय सुरू करणे या विषयावर चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीची बैठक रवीवारी हुतात्मा स्मारक चिमूर येथे पार पडली. सभेत सर्व पक्षीय चिमूर क्रांती जिल्हा कृती समीती ने बैठक घेवुन चिमूर येथे पंधरा दिवसात उप जिल्हाधीकारी कार्यालय सुरु करा अन्यथा चिमूर नगर परिषदच्या होवु घातलेल्या निवडणूकीवर बहीष्कार घालु अशा आशयाचे निवेदण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना उपविभागीय अधिकारी मार्फत दिले आहे.

चिमूर येथे अप्पर जिल्हाधीकारी कार्यालय सुरु करन्याच्या दृष्टीने तत्कालीन भाजपा सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान केली होती दरम्यान अधिसुचना काढली गेली चंद्रपूर जिल्ह्याचे भौगोलीक क्षेत्र तसेच चिमूर नागभीड सिंदेवाही व ब्रम्हपूरी या तालुक्याचे जिल्हा मुख्यालया पासुनचे अंतर विचारात घेता जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करन्यास पद मंजूरीस व त्या अनुषंगीक बाबीस मान्यता दिली व अव्वल कारकुन वसंता नैताम लिपीक टंकलेखक सचिन डाहुले यांची नियुक्ती करून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी त्यांना भारमुक्त करन्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी १७ डिसे २०१९ ला दिला होता मात्र तेरा महीन्याचा कालावधी लोटला कार्यालयाच्या भिंतीला अप्पर जिल्हाधीकारी कार्यालयाची पाटी लागली आहे कार्यालय कुलूप बंद आहे चिमूर येथे अप्पर जिल्हाधीकारी निशीकांत सुके यांची नेमणूक झाली होती मात्र मध्यंतरी ब्रहपूरी जिल्हा होनार या चर्चेला पेव फुटले होते त्यामुळे चिमूर जिल्हा कृती समीतीने बैठक घेवुन ब्रम्हपूरी जिल्हातर होनार नाही ना अशी शंका व्यक्त केली होती मात्र प्रशासनाने २६ ऑगस्ट २०२० ला चिमूर येथील अप्पर जिल्हाधीकारी कार्यालय रद्द करून मध्यवर्ती ठिकाण ब्रम्हपूरी येथे स्थालांतरीत करन्याच्या मागणीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल मागीवीला होता त्या संदर्भात उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी २७ ऑगस्ट २०२० ला चिमूर क्रांती भूमीची सुलभता उपलब्ध सोयी सुविधा अंतर व प्रशासकीय सुविधा आणी जनतेची मागणी या विषयी सविस्तर योग्य वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधीकारी यांना पाठवीला असल्याची माहीती आहे.

या वरून सरकारने अप्पर जिल्हाधीकारी कार्यालय चिमुर ला शासनाने फक्त कागदावरच मान्यता दिलेली असल्याचे समजते मात्र जिल्हाधीकारी चंद्रपूर यांनी २९ जाने २०२१ ला अप्पर जिल्हाधीकारी कार्यालय चिमुर यांच्या कार्यक्षेत्रातील तालुके मंडळ महसुल तलाठी साजे q त्यामध्ये अंतभूत होणाऱ्या गावाची यादी प्रसीद्ध करणेबाबत आक्षेप नोंदविण्याची अधिसुचना काढली बैठकीत सर्वपक्षीय चिमूर क्रांती जिल्हा कृती समीतीने ही चुकीची पद्धत असल्याचे सांगत तात्काळ आक्षेप नोंदीची प्रक्रिया थांबवावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचे मानस कृती समीती ने निर्धारीत केले आहे दरम्यान भविष्यात होनाऱ्या चिमूर नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीची अधिसुचना जारी होन्यापूर्वी पंधरा दिवसात सदरचे कार्यालय सुरु करावे अन्यथा सर्व पक्षीय दृष्टीकोनातुन चिमूर नगरपरिषदेच्या सार्वत्रीक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरविन्यात आले आहे तात्काळ अप्पर जिल्हाधीकारी कार्यालय सुरु करण्या संदर्भाने कार्यवाहीचे आदेश द्यावेत अन्यथा भविष्यात होनाऱ्या सर्व घडामोडीची जबाबदारी चिमूरकरांची राहनार नाही ती जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महसुल मंत्री बाळा साहेब थोरात यांना पाठवीलेल्या निवेदनातुन दिला आहे.

निवेदन देताना यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र बंडे, प्रा संजय पिठाडे डॉ रमेश गजभे सतिश वारजूकर धनराज मुंगले गजानन बुटके माधव बिरजे रोशन ढोक बाळकृष्ण बोभाटे प्रविण सातपुते रमेश खेरे गजाननजी अगडे रमेश कराळे डॉ हेमंत जांभूळे, अविनाश अगडे मनोज हजारे अविनाश रासेकर सुनिल दाभेकर प्रमोद दांडेकर रमेश दडमल सौ लीलाबाई नंदरधने सिंधुताई रामटेके दिपक सिंह चंदेल यशवंत वाघे स्वप्नील बघेल विलास मेहरकुरे ज्ञानेश्वर शिरभैय्ये लोकेश कावळे अरुण लोहकरे अ कदीर मोहम्मद युनूस शेख आनंद गुरनुले उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here