July 8, 2020

Newsposts.

Marathi | Telugu | Hindi News

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करा : खा धानोरकरांनि दिले प्रशासनाला निर्देश

यवतमाळ【 वणी】 शहरात सात कोरोना बाधित आढळल्याने शहरातील तीन ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले त्यातील सेवा नगर मधील प्रतिबंधित क्षेत्रात मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करावा असे निर्देश खासदार बाळू धानोरकर यांनी प्रशासनाला दिले
येथील उपविभागीय कार्यालयात प्रतिबंधित क्षेत्राची माहिती घेण्यासाठी खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,तहसीलदार श्याम धनमने, मुख्याधिकारी संदीप बोरकर,ठाणेदार वैभव जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ अर्चना देठे, वैद्यकीय अधिकारी डॉ कमलाकर पोहे ,गटविकास अधिकारी राजेश गायणार उपस्थित होते यावेळी शहरात असलेल्या प्रीतिबंधीत क्षेत्रात किती परिवार राहतात, किती जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले,होम कॉरनटाईन किती आहे याची माहिती घेण्यात आली ,त्याच बरोबर विलगिकरण कक्षात असलेल्यांची योग्य काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले प्रतिबंधित क्षेत्र असलेले सेवा नगर परिसरात 60 परिवाराच्या उदरनिर्वाहा चा प्रश्न मोठा आहे त्यामुळे या क्षेत्रातील परिवाराना प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आल्याने मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी या बाबत नगर पालिका प्रशासना कडून सर्वेक्षण सुरू झाले असून दि 1 जुलै पासून सेवाभावी संस्था च्या मदतीने त्यांना धान्य पुरवठा करणार असल्याचे सांगितले खासदार धानोरकर यांनी कोणतीही गरज पडल्यास प्रशासनाने कळवावे त्याना पूर्ण मदत केली जाईल असे सांगितले यावेळी ओम ठाकूर,भास्कर गोरे,आशिष खुलसंगे,अखिल सातोकर उपस्थित होते