July 8, 2020

Newsposts.

Marathi | Telugu | Hindi News

गडचांदुरात पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन: आ.सुभाष धोटे यांचे नेतृत्व

चंद्रपूर【गडचांदूर】देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली अन्यायकारक दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी देशभर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन सुरु आहे.
कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर नगरपालिकेत जवळ राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन देण्यात आले असून ही दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले.
देशात व राज्यात कोरोना संसर्गाच्या प्रार्श्वभुमीवर संपुर्ण देशात ताळेबंदी असतांना गेल्या चार महिन्यांपासूने लोकांच्या हाताला रोजगार नाही. रोजगाराअभावी शेतकरी, कष्टकरी, मजुर वर्ग व लहान व्यावसायिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशातच केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ करून देशातील गोर-गरीब जनतेवर अन्याय केला असल्याचे आमदार सुभाष धोटे यांनी म्हटले.
यावेळी कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, नगराध्यक्षा सविता टेकाम, पंचायत समितीचे माजी सभापती नोगराज मंगरूळकर,बाळासाहेब मोहितकर, गटनेता विक्रम येरणे, शहराध्यक्ष रोहित शिंगाडे, बिबी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आशिष देरकर, सतीश बेतावर, नगरसेविका जयश्री ताकसांडे, अर्चना वांढरे, नगरसेवक राहुल उमरे, शिवाजी वांढरे
माजी सरपंच शिवकुमार राठी, गणेश सातपडी, अभय मुनोत, श्रीकांत सातपाडी, युवक काँग्रेसचे महासचिव शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, शेख अहमद भाई, एनएसयुआय तालुका अध्यक्ष प्रितम सातपुते, आशिष वांढरे, राहुल ताकसांडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.