July 8, 2020

Newsposts.

Marathi | Telugu | Hindi News

चंद्रपूर जिल्ह्यातील गांगलवाडी येथील लहान चार वर्षीय मुलीगी कोरोना पॉझिटिव्ह

  • चार वर्षीय मुलीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे, ही मुलगी आपल्या आजोबाच्या संपर्कात आली होती.

  • २९ जून रोजी ८ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. या ८ बाधितांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्याची संख्या ९५ झाली आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये सोमवार दिनांक २९ जून रोजी ८ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. या ८ बाधितांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्याची संख्या ९५ झाली आहे. यामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या ४२ आहे. आतापर्यंत उपचार होऊन कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ५३ आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ब्रम्हपुरी शहरातील पटेल नगर परिसरातील यापूर्वीच्या कोरोना बाधित असणाऱ्या कुटुंबातील ३० वर्षीय महिला व ४ वर्षीय मुलाचा समावेश आहे. ब्रम्हपुरी शहरातील गुजरी वार्ड येथील यापूर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील ५० वर्षीय महिला देखील आज कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. ब्रम्हपुरी शहरातील नागपूर येथून परत आलेल्या २५ वर्षीय संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या महिलेचा २६ जून रोजी घेण्यात आलेला नमुना पॉझिटिव्ह ठरला आहे. तर गांगलवाडी येथील संपर्कातून तयार झालेल्या चार पॉझिटिव्हची आज नोंद करण्यात आली आहे. यामध्ये यापूर्वी पॉझिटिव्ह ठरलेल्या बाधिताच्या ३० वर्षीय मुलाचा समावेश आहे. गांगलवाडी येथीलच आरोग्य सेतू अॅप मार्फत मिळालेल्या माहितीनुसार एका ७० वर्षीय वरिष्ठ नागरिकाचे स्वॅब घेण्यात आले. २८ जूनला घेतलेला हा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. गांगलवाडीमध्ये संपर्कातील अहवाल मोठ्या प्रमाणात तपासले जात आहे. त्यामुळे यापूर्वी पॉझिटीव्ह ठरलेल्या बाधितांच्या ५५ वर्षीय भावाचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.संपर्कातील नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेणे किती गरजेचे आहे हे या उदाहरणावरून पुढे आले आहे. गांगलवाडी येथील एका चार वर्षीय मुलीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. ही मुलगी आपल्या आजोबाच्या संपर्कात आली होती.