July 11, 2020

Newsposts.

Marathi | Telugu | Hindi News

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना धान्य कीटचे वाटप : खासदार धानोरकर यांनी दिले होते निर्देश

यवतमाळ【वणी 】शहरात सात कोरोना बाधित आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली होती प्रशासनाने खबरदारी म्हणून तीन क्षेत्रांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे यातील सेवा नगर येथील प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांच्या उदरनिर्वाहा चा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना धान्य किट देण्याचे निर्देश दिले होते त्यावरून प्रशासनाने 35 परिवाराला प्रशासनाच्या वतीने धान्य किट वाटण्यात असली
शहरात सात कोरोना बाधित आढळल्याने याचा संसर्ग वाढू नये या करिता प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलीत शहरातील प्रगती नगर परिसर,धुमे नगर परिसर व सेवा नगर परिसर सील करून हे तीन क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले आहे यातील प्रगती नगर व धुमे नगर प्रतिबंधित क्षेत्रात सदन नागरिक राहता मात्र सेवा नगर येथील प्रतिबंधित क्षेत्रातिल नागरी मोल मजुरी करून आपकी गुजराण करतात क्षेत्र सील केल्यामुळे येथील 35 परिवारांच्या उदरनिर्वाहा चा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांनी दि 29 जून ला उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,तहसीलदार श्याम धनमने, ठाणेदार वैभव जाधव ,मुख्याधिकारी संदीप बोरकर सह अन्य अधिकारी उपस्थित होते यावेळी खा धानोरकर यांनी सेवा नगर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या जेवणाचा मुद्दा उपस्थित केला या परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांना धान्य किट चा पुरवठा करण्याचे निर्देश दिले होते त्यामुळे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी पालिका कर्मचाऱ्यां कडून सर्वेक्षण केले व प्रतिबंधित क्षेत्रात असलेक्या 35 परिवाराला जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.

  • सेवा नगर येथील प्रतिबंधित क्षेत्रात नगर पालिकेने सर्वेक्षण केले असता 35 परिवाराना धान्याची गरज होती त्यामळे महसूल प्रशासनाच्या मदतीने प्रत्येक कुटुंबाला 5 किलो आटा, तीन किलो तांदूळ,तेल,तिखट,हळद,तूरडाळ,सॅनिटायझर ची किट वाटण्यात आली आहे
    संदीप बोरकर
    मुख्याधिकारी ,नगर परिषद वणी