July 11, 2020

Newsposts.

Marathi | Telugu | Hindi News

कोरपना येथे काँग्रेसचे पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात धरणे आंदोलन

चंद्रपूर【कोरपना】देशात पेट्रोल व डिझेलची दररोज मोठ्या प्रमाणात दरवाढ होत आहे. या निषेधार्थ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या सूचनेवरून तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी , कोरपना च्या वतीने कोरपना येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन मंगळवारी करण्यात आले.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर गोडे, जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, पंचायत समिती सभापती रूपाली तोडासे, उपसभापती सिंधू आस्वले, पंचायत समिती सदस्य श्याम रणदिवे, संभाजी कोवे, जिल्हा परिषद सदस्य विना मालेकर, कल्पना पेचे, महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष ललिता गेडाम,
उत्तमराव पेचे, सिताराम कोडापे, नगराध्यक्ष कांताताई भगत, उपनगराध्यक्ष मनोहर चन्ने,
सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुनील बावणे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इस्माईल भाई, राजाबाबू गलगट, नितीन बावणे, रसूल पटेल, सुरेश मालेकर, गणेश गोडे आदी उपस्थित होते. यावेळी पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत
तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शैलेश लोखंडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.