घुग्घूस नगरपरिषद स्थापना समितीचे दोन – दोन पत्रकार परिषद ?

0
413
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

सौ. रंजीता आगदारी यांचा राजीनामा मात्र जिल्हापरिषद महिला सभापती व पंचायत समिती उपसभापती यांचा राजीनामा का नाही ?

चंद्रपूर : घुग्घूस वासीयांच्या नगरपरिषदच्या मागणीला वर्षाच्या संघर्षाला अखेेेर यश मिळाले असून घुग्घूस नगरपरिषदेची पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्यातर्फे शासकीय स्तरावर घोषणा केली.
या मागणी करिता अधीवेशन काळात राजूरेड्डी हे मुंबई येथे तळ ठोकून होते.

आज घुग्घुस येथे आलेले आमदार किशोर जोरगेवार यांनी ही नगरपरिषदेच्या मागणीसाठी राजूरेड्डी यांनी ही अथक परिश्रम घेतल्याचे सांगितले हे विशेष

सर्व पक्षीय नगरपरिषद स्थापना समितीच्या वतीने 31 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यलया प्रांगणात पत्रकार परिषद घेतली यामध्ये सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
लगेच आज 01 जानेवारी रोजी चंद्रपुरात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी उपस्थित नेत्यांनी हे यश कुणा एकाच नसून सर्व पक्षीयांच आहे.

यासाठी 23 डिसेंम्बरपासून सर्व पक्षीयांनी ठिय्या आंदोलन, मुंडन आंदोलन, अर्धनग्न, चक्काजाम व घुगूस बंद असे विविध आंदोलने सर्व पक्षियांनी केलं होतं त्याचंच यश म्हणून सरकारला घुग्घूस नगरपरिषदेची घोषणा करण्यास भाग पाडले.

सर्व पक्षीयांच्या पत्रकार परिषदेत घुग्घूस कांग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी व एस सी सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांची अनुपस्थिती हे लक्षवेधी ठरली. याबाबत NEWS POST ने राजू रेड्डी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की हे यशा अपयशाचा विषय नसून गावविकासाचा विषय आहे.  सर्वपक्षीयांनी आपल्या स्तरावर प्रयत्न केले आहे याबाबत कुणी एकानेही श्रेय घेण्याचा प्रश्न उदभवत नाही, पत्रकार परिषदेबाबत आम्हाला उशिरा कळल्याने आम्ही उपस्थित होऊ शकलो नाही.

घुग्घूस नगरपरिषद बनण्याचं श्रेय राजू रेड्डी यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलं, सर्व पक्षीयांच निवेदन व पालकमंत्री वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याने नगरपरिषदेला यश आले आहे असे ही सांगितले.

मात्र पत्रकार परिषदेत कांग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नावाला अनेकांचा विरोध होता, त्यांनी याबाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असे पत्रकार परिषदेत उल्लेख केला.