• प्रदूषण वाढल्याने नागरिकांत आक्रोश
चंद्रपूर : प्रदूषणाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर येत असलेल्या घुग्घुस परिसरातील एसीसी कंपनीतुन निघणाऱ्या सिमेंटयुक्त धूळ कणामुळे नागरिकांना डोळ्यांच्या जळजळरूपी आजार व दमा, टीबी अन्य स्वरूपाच्या आजाराला बळी पडावे लागत आहे.
याची दखल घेवून प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र तथा एसीसी सिमेंट कंपनीला मागील वर्षी डिसेंम्बर महिन्यात नोटीस देऊन प्रदूषण संदर्भात सात दिवसात जवाब मागितले होते.
लोकडाऊन काळात कंपनीचे उत्पादन पूर्णतः बंद असल्याने प्रदूषण कमी झाले होते.
आता मात्र प्रदूषणाने उंचाक गाठला असून नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. कंपनीला लागूनच माऊंट कारमेल शाळा असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे.
अश्या वेळी नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कंपनीला वेठीस धरणे आवश्यक असतांना स्वतःचे ठेके वाचविण्यासाठी व वाढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी नियंत्रण प्रदूषण मंडळाला पत्र पाठवून एसीसी कंपनी प्रदूषण करीत नसल्याची ग्वाही देऊन कंपनीची चापलुसी करण्यात धन्यता मानल्याने नागरिकांत प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे.