डेंगू – मलेरिया व अन्य आजारापासून रक्षणासाठी किटनाशक फवारणी करावी

काँग्रेस तर्फे नगरपरिषद प्रशासकाना निवेदन

घुग्घुस : गेल्या काही दिवसा पासून सतत होत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचून डबके निर्माण झाले आहे. नाल्या गटारी तुडुंब भरले असून नाल्याच्या सांड – पाण्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे डेंगू मलेरिया व अन्य आजारांची साथ घुग्घुस शहरात पसरत असून नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी तातळीने शहरात किटनाशक फवारणी करावी.

कचरा कुंडीतला कचरा जमा करून ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावाबाहेर विल्हेवाट लावावी अशी मागणी निवेदनातून घुग्घुस काँग्रेस तर्फे करण्यात आली.
याप्रसंगी शहर अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, कामगार नेते सैय्यद अनवर, सिनू गुडला, विजय माटला, रोशन दंतलवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.