नागरिकांना त्वरीत स्थायी घरपट्टे द्यावे : काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारीना निवेदन

0
246
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस येथील अमराई सह इतर वॉर्डात मागील तीस ते पस्तीस वर्षापासून नजुलच्या जागेवर राहणाऱ्या नागरिकांना अतिक्रमण केल्याबद्दल तलाठी घुग्घुस याने जवळपास दीडशे नागरिकांना नोटीस दिल्या व याची सूनवाई तहसील कार्यालयात दिनांक 01 मार्च रोजी ठेवण्यात आली.

यामुळे कोरोना काळात अश्या प्रकारच्या नोटीशी मिळाल्याने नागरिकांत उलट – सुलट चर्चेला उधाण आले व भीतीचे वातावरण निर्माण झाले यासंदर्भातील माहिती मिळताच काल रात्री घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर यांनी अमराई येथे जाऊन नागरिकांची भेट घेतली होती.

व आज सकाळी 10 वाजता तहसीलदार यांची भेट घेऊन प्रकरण समजून घेतले तसेच कोरोनाच्या काळात नागरिकांना दंडा करिता त्रास देऊ नये असे निवेदन दिले. तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नागरिकांना स्थायी घरपट्टे देण्यासंदर्भात निवेदन दिले

यावेळी मोठ्या संख्येने अमराई येथील नागरिक उपस्थित होते नागरिकांनी घाबरून जायचे नाही.
तुमचे घर सोडा तुमच्या केसाला ही धक्का लागू देणार नसल्याची ग्वाही ही यावेळी पुनःश्च एकदा काँग्रेस नेत्यांनी दिली. तसेच नागरिकांना कायम स्वरूपी पट्टे ही मिळवून देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दीपक पेंदोर, मारोती कोडापे,चरणदास टेकाम,महेश कोडापे,उज्वला टिपले, कल्पना टेकाम, अंकुश उइके, सुखदेव सावंत,मधुकर पाझारे,राजेश येटे,रमेश गेडाम, व बहुसंख्येने अमराई येथील नागरिक उपस्थित होते.