ऑटो भाड्यावरुन वाद, एकाचा भोसकून खून

0
258
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

खामगाव : ऑटो भाड्याच्‍या वादातून एका ऑटो चालकाने दुसऱ्या ऑटो चालकाच्‍या पोटात धारधार शस्‍त्राने भोसकून खून केल्‍याची घटना शहरातील निर्मल टर्निग जवळ घडली. सदर घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील निर्मल टर्निंग जवळील ऑटो स्‍टॉप वर मेहरसिंग गोविंदसिंग चव्‍हाण (४३) व अजय विनायक आवटे (४०) या दोघांचा १ एप्रिल रोजी सायकांळी ६ वाजता प्रवाशी घेवून जाण्याच्‍या कारणावरुन वाद झाला. सदर वाद इतर ऑटो चालकांनी निवळला. परंतु, काही वेळानंतर उपरोक्‍त दोघांमध्ये पुन्‍हा वाद उफाळून आल्‍याने त्‍यातीन मेहरसिंग चव्‍हाण याने त्‍याच्‍या जवळील धारधार शस्‍त्राने अजय आवटे याच्‍या पोटामध्ये भोसकून त्‍याला गंभीर जखमी केले. अजय आवटे हा रक्‍ताच्‍या थारोळ्यात जमीनीवर कोसळला. दरम्‍यान आरोपी मेहरसिंग चव्‍हाण याने अजय आवटे यास स्‍वतःच्‍या ऑटोमध्येच टाकून तातडीने उपचारार्थ येथील सामान्‍य रुग्‍णालयामध्ये दाखल केले. त्‍याठिकाणी डाॅक्‍टरांनी त्‍याची तपासणी करुन मृत घोषित केले. घटनेची माहिती शिवाजी नगर पोलीसांना मिळताच ठाणेदार सुनिल हुड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्‍थळी धाव घेवून पंचनामा केला व सामान्‍य रुग्‍णालय येथे पोहचून आरोपी मेहरसिंग चव्‍हाण यास रुग्‍णालय आवारातून ताब्‍यात घेतले.