खासदार बाळु धानोरकरांनी PPE किट लावून साधला रुग्णाशी संवाद

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस येथील आरोग्य यंत्रणेत लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध होणार

चंद्रपूर : तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून घुग्घुस ची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात येथे वेकोलि परिसर आहे. वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या राहतात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील राजीव रतन वेकोलिचे रुग्णालय आहे. येथे २८ ऑक्सिजन व २८ साधे बेड्स आहे. वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेत येत्या काही दिवसात १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २ पूर्ण क्षमतेचे व्हेंटिलेटर व ५ एनआयव्ही तसेच ऑक्सिजन प्लॉट लवकरात लवकर उपलब्ध करा तसेच टेम्पो क्लब येथे १०० बेड्सचे स्वतंत्र विलगीकरण करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.

खासदार बाळू धानोरकर यांनी पीपीई किट लावून कोविड रुग्णाची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, सब एरिया पिसा रेड्डी व राजीव रतन वैदकीय अधीक्षक डॉ. आनंद यांच्या कडून रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या असता याठिकाणी ऑक्सिजन कमी पडत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. खासदारांनी या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व्हेंटिलेटर युक्त बेड तातडीने निर्माण करण्याच्या सूचना दिल्या व रुग्णालयात कसल्याही प्रकारे समस्या असल्यास तातळीने आपण प्रशासनाची मदद घ्यावी अश्या सूचना खासदारांनी दिल्या आहेत.

काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी खासदारांना रुग्णवाहिकेची मागणी केली असता एक रुग्णवाहिका तातडीने देणार असल्याचे खासदारांनी कबूल केले. लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून देत असल्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रेय, काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी , लक्ष्मण सादलावरजी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे , जिल्हाध्यक्ष पवन आगदारी , कामगार नेते सैय्यद अनवर, यश दत्तात्रय, युवा नेते सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख, गजानन गोहणे, कीशीर बोबडे, प्रेमानंद जोगी, बालकिशन कूळसंगे आदी उपस्थित होते