वाघाच्या हल्लायात महिला ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : मूल तालुक्यातील सुशी दाबगावं येथील महिला वनविकास मंडळाच्या जगलात सरपणासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हमला करुन जागीच ठार केल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.

वैशाली विलास मांदाळे रा. सुशी दाबगाव असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे. सदर घटना वनविकास महामंडळाच्या सुशी दाबगाव येथील कक्ष क्रमांक 527 मध्ये घडली.