रामाळा तलाव रक्षणार्थ इको-प्रोचा सत्याग्रह लढा विरोधकांना खुपतोय

0
265
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• स्थानिक शिवसेना विरोधात; युवा नेते आदित्य ठाकरे धोतरेंच्या पाठीशी

• सर्वाधिक मागण्या सत्ताधारी भाजप शासनाकडे; तरीही शिवसेना म्हणतेय धोतरे भाजपची “बी” टीम

• आंदोलनाला केलेला विरोध शिवसेना अध्यक्षांना अंगलट येणार काय?

चंद्रपूर : शहरातील गोंडकालीन ऐतिहासीक वारसा असलेला रामाळा तलावासाठी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागण्यासाठी सोमवार, 22 फेब्रुवारीपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू झाले. हप्ता उलटत नाही तोच एका शिवसेना नेत्यांचा विरोध उफाळून आला. एकिकडे आदर आणि सन्मान व्यक्त करताना दुसरीकडे आकसही ओकण्यात येत होता. अशातच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे धोतरेंच्या पाठीशी असल्याच्या बातम्या आल्या.

उपोषणातून केलेल्या सर्वाधिक मागण्या केंद्र सरकारकङे आहेत. एक मागणी स्थानिक महानगरपालिकेकङे आहे. मनपात भाजपची सत्ता आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. असे असतानाही स्थानिक शिवसेना नेत्याने हे आंदोलन म्हणजे महाआघाडीविरोधात असल्याचा भ्रम तयार केला. मुनगंटीवारांच्याही कार्यकालात मूल ते चंद्रपूर पदयात्रा निघाली आहे. युतीच्या काळात शिवसेनाच सत्तेत होती. पर्यावरण मंत्रीच शिवसेनेचे होते. तरीही स्थानिक नेत्यांनी सखोल अभ्यास न करता कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप केले. पण, झाले उलट. खुद्द युवा नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली. मागण्या मान्य करू असे आश्वासन दिले. इतकेच काय तर पुढील महिन्यात रामाला तलाव आणि चंद्रपूरचा किल्ला बघण्यासाठी येऊ असे सांगितले. त्यामुळे भाजपची “बी” टीम म्हणणारे आता उत्तर देतील काय?