जिल्ह्यात फक्त 3 हजार लस शिल्लक ; आवश्कय लससाठा अजूनही पोहचला नाही
चंद्रपूर : जिल्ह्यातील लसीकरणाला लागणारा आवश्यक कोरोना प्रतिबंधात्मक लससाठा जिल्ह्याला मिळाला नसल्याने फक्त तीन हजार लसींचा साठा उरलेला असल्याने कोरोना लसीकरण मोहीमेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी राज्य शासनाने पाऊले उचलीत आहेत. मात्र आता पुरेसा साठाच जिल्ह्यांना मिळण्यास विलंब होत असल्याने जिल्हास्तरावरील लसीकरणाला अडचणी निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर येथे जिल्ह्याचे ठिकाणी असलेला केोरोना प्रतिबंधात्मक लसींचा साठा संपुष्टात आला आहे. तर फक्त तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य केंद्रांवर फक्त 3 हजार लस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाने मागणी केलेला साठा जिल्ह्यात न पोचल्यास जिल्ह्यात कोरोना लसीकरण अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीकरण केंद्रे बंद करावी लागणार आहेत. काल गुरूवार 1 एप्रिल पासून 45 वर्षांच्या वरील नागरिकांना लसीरकणाला सुरूवात झालेली आहे. लस घेण्याबाबत नोंदणी करावयाच्या ॲपवर सध्यास्थितीत नोंदणी झालेल्या व 45 वर्षांवरील व्यक्ती अशा एकूण 14 लाखाहून अधिक नागरिकांना जिल्ह्यात लस अपेक्षित आहे. कोविड योद्धा, कोमॉरबीड रुग्ण आणि 45 वर्षे वयावरील व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या 81 करण्यात आली आहे. मात्र आता त्या अनुरूप लसींचा साठा देखील उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र 1 लाख 17 हजार लसींचा साठा नोंदवूनही आवक नसल्याने कोरोना लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्तयता आहे. त्यामुळे जिल्ह्यात लस तातडीने पोहचावी याकरिता जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.