ट्रामा केअर युनिट मध्ये 50 खाटांचे कोविड केंद्र सुरू करण्यास मान्यता : राजू उंबरकर यांच्या प्रयत्नांना यश

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

वणी : तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता वणी येथील ट्रामा केअर इमारतीमध्ये अत्याधुनिक सोयींनी युक्त कोविड केंद्र उभारावे यासाठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर केलेल्या मागणीला प्रतिसाद देत जिल्हा आरोग्य प्रशासनाने येथील ट्रामा केअर युनिट मध्ये आक्सिजन युक्त 50 खाटांचे कोविड केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लेखी पत्र डॉ. तरंगतुषार वारे यांनी राजू उंबरकर याना दिले आहे.

वणी तालुक्याची आवश्यकता लक्षात घेता वणी येथे ट्रामा केयर यूनिट ईमारतीत 60 खाटाचे ऑक्सीजन युक्त सुविधेसह कोविड केंद्र कार्यान्वीत करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देऊन मागणी केली होती. त्याआधी 5 ऑक्टोबर 2020 ला ट्रामा केअर इमारती मध्ये सर्व सोयींनी युक्त कोविड केंद्र सुरू करण्यासाठी राजू उंबरकर यांनी उपोषण केले होते. त्यावेळी त्यांना वणी येथे कोविड केंद्र तयार करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण न केल्यामुळे आंदोलनाचा इशारा देऊन त्वरित 60 खाटांचे ऑक्सिजन युक्त कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. या आंदोलनाची व पत्राची दखल घेऊन वणी येथे कोविड केंद्र त्वरीत कार्यान्वीत करण्यात येत आहे. असे लेखी पत्र यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिले आहे.