चंद्रपूर शहरातील रुग्णसंख्येत मोठी घट, वर्षभरात २४ हजार १४४ रुग्णांनी केली कोरोनावर मात; 553 रुग्णावर उपचार सुरु

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ३३ हजार २१० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख ८१०४ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तर उर्वरित २५ हजार १०६ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २४ हजार १४४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. उर्वरित सध्या ५३३ रुग्ण उपचार घेत आहेत.

मागील वर्षी कोव्हिडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच महानगरपालिकेने व्यापक उपाययोजना केल्या. शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले. उपचारासाठी वन अकादमी व सैनिकी शाळा येथे व्यवस्था करण्यात आली. राज्य शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका अंमलबजावणी करीत आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची अँटीजन चाचणी, विनामास्क फिरणाऱ्यावर दंड, निर्बंधानंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यावर कारवाई, व्यापक लसीकरण मोहीम यामुळे सकारात्मक बदल दिसून येत आहेत. व्यापक उपाययोजनांमुळे शहरातील एकूण एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्यादेखील कमी होत आहे. एप्रिलअखेर एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 4468 इतकी होती. ती २ जूनपर्यंत ५३३ पर्यंत कमी झाली आहे. दरम्यान, ४०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शहरात एप्रिलअखेर गृहविलीगीकरणातील रुग्ण संख्या २४०० इतकी होती. ती २ जून रोजी २११ पर्यंत कमी झाली आहे. यासोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, एक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्याही घटली आहे. सध्या खासगी मध्ये भरती संख्या २११, मनपा कोव्हीड केअर सेंटर मध्ये केवळ ६१ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे. एप्रिलअखेर १४ हजार ३२८ रुग्ण बरे झाले होते. ही संख्या आज २४ हजार१४४ वर पोहचली आहे. ही बाब दिलासादायक असली तरी नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे याचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार व मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.

एकूण एक्टिव पॉझिटिव्ह : 553
– एकूण गृहविलगीकरण : 211
– खासगीमध्ये भरती संख्या 281
– कोव्हीड केअर सेंटर रुग्ण : 61