महागाई च्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने कोरपना येथे आंदोलन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

कोरपना : केन्द्र व राज्य सरकारच्या वतीने विविध वस्तु वर दरवाढ होत आहे याच दरवाढ विरोधात बहुजन मुक्ती पार्टी युवा व महीला आघाडीच्या वतीने कोरपना तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

दिवसेंदिवस अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव आभाळाला भिडत आहे. केन्द्र व राज्य सरकारच्या वतीने डीझेल, इंधन गॅस, खादय तेल, विज, दरवाढ होत आहे.

याच दरवाढ विरोधात कोरपना तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. व तहसीलदार कोरपना ला निवेदन ही देण्यात आले. या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टी महीला आघाडी च्या जिल्हा अध्यक्ष रचना गेडाम व सलाहकार प्रा. डॉ कविता चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी युवा व महीला आघाडी च्या कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.