वाघाने डरकाळी फोडताच वनविभागाची चमू मागल्यापायी परतली

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : गेल्या अनेक दिवसांपासून वाघाची दहशत निर्माण झालेली असून नुकताच सुशी येथील एका महिलेला वाघाने ठार केले होते. तर सुशी, दाबगावं, व परिसरातील गावातील अनेक गुरांना शेळ्या मेंढ्या ना हला करून ठार करीत असल्याची क्रिया नित्याचीच झाली आहे.

काल तारखेला दाब गाव मक्ता येथील शंकरजी जुव्हारे या गरीब शेतकऱ्याचे दोन गुरे ज्यात एक दुधाळ जर्शी गाय व बैल वाघाने ठार केले त्यात त्यांची मोठी नुकसान झालेली आहे. त्यामुळे त्याचा पंचनामा करण्याच्या व क्यमेरा लावण्याच्या हेतूने वनविभागाची चमू वनरक्षक ठमके मॅडम, वनकर्मचारी गावातील काही नागरिक गुरांचे मालक व पत्रकार दुर्वास घोंगडे हे गेले होते. एका बैलाचा पंचनामा झाला क्यामेरां पण लावले तेव्हा वाघाचे पगमारक दिसले मात्र वाघ बाहेर निघून गेला असावा या आशेने सगळी चमू दुसऱ्या दुधाळ गायीचा शोध घेत थेट वाघा जवळच पोहोचली तेव्हा दोन्हीही पटेदार वाघ ठार केलेल्या गायीवर दोन्हीही बाजूने तावं मारीत होते. दरम्यान चमू बघून डरकाळी फोडली आणि सगळ्यांची तारांबळ उडाली सैरावरा पळणार ठेवढ्यात वनविभागाच्या चमूने सावधगिरी बाळगन्याचा साला दिला कुंहीही पळून जाऊ नका अशी समज देत सगळ्यांना उलट पायी जाण्याचे सांगून परत केले आणि उपस्थित सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

सदर घटना ही सातारा तुकुम बीटातली कक्ष क्रमांक ५४० मधली असून सदर वाघ हे अतिशय हिंस्र असून सुशी दाब गाव व परिसरातील गावात मोठी दहशत निर्माण झालेली आहे. सद्या पावसाळ्याचे दिवसास सुरावात झालेली असल्याने शेतकरी मशागतीच्या कामाला लागला असून अनेकांची शेत हे जंगली शिवराला व शिवारात आहेत. मात्र वाघाच्या दिवसागणिक भेटी आणि हल्याच्या घटना वाढत असल्याने मोठी भीती पसरली असून शेती करावी की नाही या विवंचनेत आहेत.

तर या समस्येची गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाची सदर वाघाच्या तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. तर तात्काळ वाघाच्या बंदोबस्त न झाल्यास गाव वाशी आंदोलन करण्याचा पवित्राघेतलाय असे समजते. बघितले त्यावरून वाघ दोन असल्याची पुष्टी झाली आणि नुकताच निघाल्याचे तोच वाघ अगोदर फरकडात गेलेल्या गायीला कळले वांकरमाची भयभीत झालेले आहेत.

काल वाघाच्या हल्यात मृत पावलेल्या गाय आणि बैलाचा शोध घेऊन पंचनामा करण्याच्या व वनामध्ये ठार केलेल्या गुरांना खाण्या करिता आल्यानंतर त्याला टिपण्या करिता क्यामेरा लावण्याकरिता सकाळच्या सुमारास सातारा तुकुम बिटातील दाबगावं मक्ता गावापासून २ किमी अंतरावर कक्ष क्रमांक ५४० येतील वनात गेले असता गायीला फस्त करत असलेल्या दोन पटेदार वाघाचे डरकाळी ने संपूर्ण चमूच धास्तावली आणि आल्या पावलीच परतली.