तेलंगणाच्या दोन युवकांचा मंचेरीयल ते वाराणसी सायकल प्रवास

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• रस्त्यावर अपघातामुळे मृत्युमुखी पडणा-या प्राण्यांबद्दल जनजागृती

चंद्रपूर : वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या रस्त्यांवर अपघाताने मृत्युमुखी पडणा-या प्राणी पक्ष्यांच्या बाबतीत जनजागृती करण्याकरिता तेलंगणातील दोन सहासी युवकांनी मंचेरीयल ते वाराणसी सायकल प्रवास सुरू केला असुन आज शुक्रवारी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे भेट दिली.

तेलगंणाचा मंचेरीयल येथील फेंन्डस यॅनीमल ट्रस्टचे कार्यकर्ते पदम संदेश गुप्ता व बेली गंडुला नरेश या दोन युवकांनी ‘सेव लाईफ सेव नेचर’ या ध्येया अंतर्गत लोकांमध्ये जनजागृती करण्याकरिता मंचेरीयल ते वाराणसी असा अडीचहजार कि. मी. चा प्रवास सायकलने करण्याचे ठरविले. या दोन युवकांनी दि.27 जुन रोजी हमली वाडा येथील श्री हनुमान शिर्डि साई मंदिर येथे दर्शन घेवुन आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांचा मते वाहनांच्या धडकेमुळे रस्त्यावर जनावरे किंवा पक्षी मरुन पडतात. या जनावराझची किंवा पक्षांची तेव्हाच कोणीही उचलून त्यांची विल्हेवाट लावत नाही. त्यामुळे अन्य वाहनांना देखील त्याचा ञास होतो. शिवाय त्या मृत प्राण्याचा किंवा पक्षाचा कुजल्या शरीराच्या दुर्गंधीमुळे इतर वाहन चालकाला ञास होतो. तसेच मृत प्राण्याचा कुजलेल्या शरिरामुळे रोग जंतू चा प्रसार होवुन लोकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे. सज्जन व्यक्तीने अशा मृत प्राणी किंवा पक्षांना उचलून रस्त्याच्या बाजूला खड्डा करून पुरावे.

शासनाने सुध्दा रस्त्यावर अपघातामुळे मरून पडणाऱ्या प्राणी किंवा पक्षांना त्वरीत उचलण्या करिता स्वतंत्र विभाग निर्माण करावा. या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याकरिता मंचेरीयल ते वारानसी हा सायकल प्रवास करण्यात येत आहे. हा प्रवास ते पंचेचाळीस दिवसात पूर्ण करणार आहे.