काँग्रेस नेते स्व.उदयकुमार माटला यांच्या जन्मदिना निमित्त फळवाटप

घुग्घुस : काँग्रेस पक्षाचे युवा नेते स्व.उदय कुमार माटला यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृति प्रित्यर्थ विजय कुमार माटला यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस तसेच डॉ. दास रुग्णालयात फळ वितरण करण्यात आले.

याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, युवक काँग्रेस अध्यक्ष तौफिक शेख, शेखर तंगळपल्ली, सिनू गुडला, कुमार रुद्रारप, नुरुल सिद्दिकी, इर्शाद कुरेशी, रोशन दंतलवार, सुनील पाटील,विशाल मादर व अन्य पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.