वस्त्र मंत्रालयाच्या हस्तशिल्प विभागाद्वारे गांगलवाडी येथे चौपाल कार्यक्रम संपन्न

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

ब्रम्हपुरी.: हस्तशिल्प सेवा केंद्र नागपुर,कार्यालय विकास आयुक्त,नई दिल्ली, वाटर मंत्रालय विभागाद्वारे ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथे 70 हस्तशिल्प शिल्प कारागीरांसाठी विभागा तर्फे चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून एसबीआई बँकेचे शाखा व्यवस्थापक आसिम अन्सरी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून हस्तशिल्प सेवा केंद्र, नागपुर तर्फे श्री सुरेश तांडेकर हस्तशिल्प संवर्धन अधिकारी, श्री प्रियतम पुरारी कालीन प्रशिक्षण अधिकारी तसेच श्री सुनील बंसोड सचिव लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था, लोक विदयालय गांगलवाडीचे प्राचार्य प्रेमदास शेंडे, पत्रकार तथा युवा व्याख्याते राहुल मैंद यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.

भारत देशातील हस्तशिल्प कारागीर हे असंघटित असल्यामुळे त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ मिळत नसल्याने योग्य भाव मिळण्यासाठी त्यांना अतिशय परीश्रम करावे लागते. सोबतच त्यांना त्यांची वेगळी ओळख मिळत नाही. नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सुध्दा त्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये हस्तशिल्प कारागीरांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. नवीन तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण, अद्यावत साधनसामुग्री, बाजारपेठ पाहणी, डिजीटल मार्केटिंग, विक्री मेळावा, शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये मुद्रा लोन, गव्हर्मेंट ई मार्केटप्लस या ई काँमर्स वेबसाईट बद्दल सुध्दा माहिती देण्यात आली. ज्यावर नोंदणी करून कारागीर आपला माल जगभर पोहचवू शकतो. तसेच मुद्रा लोनद्वारे त्यांना अत्यल्प दरावर शासकीय बँकांमार्फत अर्थसहाय्य मिळण्यास मदत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पद्ममाकर रामटेके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकार्पण बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेचे सुनील बन्सोड, संजीव बन्सोड, पल्लवी बन्सोड, आकाश तिजारे यांनी सहकार्य केले.