कोरपना | कोराडी शेतशिवारात शेतकऱ्याची हत्या, आरोपी फरार

0
395

राजुरा (चंद्रपूर) : कोरपना तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव (सुर्या) येथील शंकर फोफरे (वय ४५) हा (दि. २) शनिवारला तीन किमी अंतरावर असलेल्या कोराडी गावानजीक असलेल्या शेतात काम करीत असताना दुपारी १ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर व गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

शंकर नेहमीप्रमाणे सकाळी शेतात तूर पिकाच्या कंपनी करण्यासाठी गेला. त्यांची पत्नी त्यामागून जेवणाचा डब्बा देऊन लगतच्या शेतात कापसाची वेचणी करीत होती. काहीही कळण्याच्या आत शंकर फोफरे यांच्यावर अज्ञान व्यक्तीने धारदार शस्त्राने डोक्यावर व गळ्यावर वर करून त्यांची हत्या केली. काही वेळांनी पतीचा आवाज येत नसल्याने घटनास्थळाकडे येऊन पहिले असता पती रक्ताने माखून मृतावस्थेत दिसल्याने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिक गोळा झाले. घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना माहित होताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी घटनास्थळी पाहणी करीत अज्ञात व्यक्ती विरोधात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल भारती करीत आहे.

शांत व संयंमी स्वभावाने नांदगाव येथे परिचीत असलेले शंकर फोफरे यांच्या हत्येने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस हत्यारांचा शोध घेत आहे.