चंद्रपूर : आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर व निस्वार्थ सेवाभावी वृत्तीने संपूर्ण देशभरात नावारूपास आलेल्या हुमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशनच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण व त्यांच्या संघटने तर्फे निराधार वयोवृद्ध महिला पुरुष व लहान बालकांसाठी हक्काचे आश्रयस्थान उभारण्यात आले व या आश्रयस्थानाचे नामकरण “अपनापण” असे करण्यात आले.
आज 03 एप्रिल रोजी बॉलिवूड मधील प्रख्यात अभिनेता रजा मुराद यांच्या हस्ते या निराधार केंद्राचे विधिवत उदघाटन शिंदे मंगल कार्यालय भद्रावती येथे करण्यात आले. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अनिल धानोरकर नगराध्यक्ष भद्रावती, प्रशांत भारती इंटक युवक जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,रवींद्र शिंदे, मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नागपूर, सोहेल रजा कॉंग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,वासुदेव ठाकरे हे होते मान्यवरांच्या हस्ते सामाजिक संस्थेच्या खालील पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आला यामध्ये प्रियंका करमरकर, सुधा पाचघरे,राजलक्ष्मी फुटाणे,अनिता वनकर,करुणा मेश्राम,सीमा घायवान,शालू दुपारे, आम्रपाली गावंडे,ज्योती घडले,रितेश भगत, संध्या खडसे,सुजाता राहुलगडे, सबिहा देवगडे, उषा मून,किरण सूर्यवंशी, रिजवाना खान, आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शाहिस्ता खान पठाण व हुमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांंनी सहकार्य केले.