चंद्रपुर : (CSTPS) औष्णिक विद्युत प्रकल्पात रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली.
7 व 8 क्रमांकाच्या बॉयलर जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली अशी माहिती मिळाली आहे.
या आगीत किती नुकसान झाले याबद्दल सविस्तर माहिती मिळालेली नाही, विद्युत उत्पादनासाठी ठेवण्यात येणारा कोळसा व त्यामधील कन्व्हेअर बेल्ट जळाला आहे.
अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असून सध्या आग काही प्रमाणात नियंत्रणात आली.