मुल शहरात अस्वलाला रेस्क्यू करून पकडले

• कर्मवीर विद्यालय उपजिल्हा रुग्णालयात अस्वलाचा वावर

चंद्रपूर : मूल शहरातील कर्मवीर महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय परिसरात नेहमीच वावर करीत असलेल्या अस्वलाला आज सोमवारी सकाळी बेशुद्धी चे इंजेक्शन देऊन पकडण्यात आले त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास श्वास घेतला आहे.

आज सकाळी साडेपाच वाजता वनपरीक्षेत्र अधिकारी (बफर) नायगमकर साहेब यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात अस्वल असल्याची माहीती संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना दीली.लगेच ही माहीती स्थानीक वनकर्मचारी व वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर साहेबांना देण्यात आली व आर आर टी पथक ताडोबा यांच्या मदतीने अस्वलाला बेशुध्दीचे इंजेक्शन देऊन सुरक्षीतपणे पकडण्यात आले. ही अस्वल नेहमी रेल्वे स्टेशन परिसर,कर्मवीर महाविद्यालय परिसर, उपजिल्हा रुग्णालय परिसरात रात्रीच्या दरम्यान फीरायची.

अस्वलीला पकडन्याचा वेळी घटना स्थळी सहाय्यक उपवन संरक्षक लखमावाड साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर साहेब, टीटीसीचे डॉ.पोडचलवार, आर आर टी ताडोबाचे अजय मराठे व टीम, क्षेत्र सहाय्यक खनके, वनरक्षक मरसकोल्हे, वनरक्षक गुरनुले, विषेश व्याघ्र सरक्षन दलाची टीम व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, स्वप्निल आक्केवार, दिनेश खेवले, अंकुश वाणी, संकल्प गणवीर, प्रतीक लेनगुरे, यश मोहुर्ले उपस्थीत होते.अस्वल पकडल्या गेल्याने परिसरातील नागरीकांनी वनविभागाचे आभार मानले.