चंद्रपूर मनपाच्या कारवाई नंतर व्यापारी भडकले, आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर कारवाई मागे

चंद्रपूर : गांधी चौकातील दुकानावर कार्यवाई केल्यामुळे व्यापारी आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली यावेळी काही व्यापाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना संपर्क करत प्रकरणाची माहिती दिली. आमदार जोरगेवार यांनी तात्काळ सदर ठिकाण गाठत मध्यस्ती केल्यानंतर मनपा प्रशासनाच्या वतीने कार्यवाई मागे घेण्यात आली. माणुसकीच्या भावनेतून काम करा अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिल्यात.

आज गांधी चौकातील मुख्य बाजारपेठेत मनपाचे पथक कार्यवाई करण्यासाठी दाखल झाले. यावेळी येथील एका दुकानावर सदर पथकाने कार्यवाही करत दुकानाला टाळा ठोकला मात्र दुकान सुरू नव्हते दुकानाचे स्वेटर बंद करून आत हिशोब सुरू असल्याचा दावा दुकान मालकाने केला. त्यामुळे मनपाच्या या कार्यवाई विरोधात येथील सर्व व्यापारी एकवटले परिणामी परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. याची माहिती काही व्यापाऱ्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना दिली. लगेच आमदार किशोर जोरगेवार सदर ठिकाणी दाखल झाले. यावेळीं आमदार जोरगेवार यांनी मध्यस्थ करत वाद शांत केला.

मनपा प्रशासनाने कोणतीही कार्यवाई करत असताना माणुकीचा दृष्टीकोन ठेवावा अशा सूचना यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्यात. व्यापाऱ्यांची भूमिका नेहमी प्रशासनाला मदत करण्याची राहिली आहे त्यामुळे त्यांना सन्मान जनक वागणूक दिल्या गेली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. आ. जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर महानगरपालिका प्रशासनाणेही केलेली कार्यवाई मागे घेतली आहे.