वाघाच्या हल्यात शेतकरी ठार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील हरणी येथील शेतकरी शामरावजी डोमाजी नन्नावरे हे शुक्रवारी 26 जून रोजी शेतात काम करत असतांना सांयकाळी ५ च्या सुमारास दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला.

घटनेची माहिती होताच वनविभाग आणी पोलीस कर्मचारी तिथे पोहचले व पंचनामा करुण शव शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चिमुर येथे पाठवीन्यात आले.

वाघाच्या हल्यात एका शेेतकऱ्याचा जिव गेला त्यामुळे शेतकऱ्यांनमध्ये भितीचे वातावरन निर्माण झाले आहे.