बनावट ATM कार्ड व्दारे १५ हजार लंपास ;  राजुरा पोलिसात तक्रार दाखल

चंद्रपूर : बनावट एटीएम कार्ड बनवून डॉ.सत्यपाल कातकर यांच्या बँक ऑफ इंडिया, शाखा राजुरा येथील खात्यामधून १५ हजार रुपये अज्ञात चोराने लंपास केले. याबाबत कातकर यांनी बँकेच्या शाखेत व राजुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पैसे काढल्यासंदर्भात मेसेज कातकर यांच्या मोबाईलवर येताच त्यांनी लगेच आपल्या खात्यातील पैसे आपल्या दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. अन्यथा पुन्हा या चोरट्याने खाते साफ केले असते.

दुसऱ्यादिवशी डॉ. सत्यपाल कातकर यांनी या घटनेबाबत बँक ऑफ इंडिया, राजुरा शाखेला व राजुरा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. विशेष म्हणजे या खात्याचे एटीएम कार्ड डॉ.सत्यपाल कातकर यांच्याकडेच होते.