राज्यात ‘Unlock’ संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील – विजय वडेट्टीवार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

राज्यात पाच स्तरांमध्ये ‘अनलॉक’ करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, त्यानंतर काहीच वेळात राज्याच्या जनसंपर्क व माहिती कार्यालयाने अनलॉकबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

यामुळे राज्य सरकारमध्येच समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. याबाबत राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता राज्यात पाच स्तरांमध्ये ‘अनलॉक’ करण्यात येणार असल्याच्या निर्णयाला तत्वता मान्यता देण्यात आली असून ‘अनलॉक’ संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठक आज पार पडली यावेळी 12 वीच्या परिक्षेसह राज्यातील लॉकडाऊन संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ही बैठक झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात पाच स्तरांमध्ये हे ‘अनलॉक’ करण्यात येणार असून ज्या 18 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा केली होती.