भद्रावतीच्या शिंदे परीवाराचे कोविड कार्य पुण्याचे : डॉ. अशोक जिवतोडे

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : भद्रावती येथील शिंदे परीवाराचे कोविड-१९ च्या दुस-या लाटेच्या काळातील भद्रावती-वरोरा तालुक्यात सुरु असलेले मानवसेवेचे कार्य पुण्याचे कार्य आहे.

जनसेवेत आपल्या कमाईतून खर्च करुन समाजाच देण लागण्याचे कार्य रवि शिंदे, डॉ. विवेक शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे, असे गौरोवोदगार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, ओबीसी व विदर्भ चळवळीतील अग्रणी डॉ. अशोक जिवतोडे यांनी आज (दि.३) ला दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांचा सत्कार करतांना काढले. व मी सदैव या कार्यात तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंता मानकर, जनता शास.निम. सह. पतसंस्थेचे अध्यक्ष रवि देवाळकर आदी उपस्थित होते.

भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती शहरात कोविड-१९ च्या दुसर्‍या लाटेत निःशुल्क कोविड सेंटर सुरू करून तथा औषधी, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन, निःशुल्क भोजन, हेल्पलाईन, निशुल्क ओपीडी आदी सेवा सुरु आहेत. कोरोना काळात कोरोनाबाधितांकरीता बेड, प्लाज्मा, आदी मिळवून दिले. भद्रावती व वरोरा तालुक्यातील गावागावात मास्क, सॅनिटायजर वाटप केले. या सर्व कार्याची दखल घेवुन डॉ. अशोक जिवतोडे यांनी शिंदे परीवाराच्या कार्याचा गौरव केला.