चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्या जवळील तोरगाव येथे आज गुरूवारी (3जून) ला सायंकाळी पाच वाजता दरम्यान विज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर माहिती अशी की, सुरेश नारायण रामटेके (वय ५५) रा.तोरगाव व अश्विनी कमलेश मेश्राम (वय १६) रा.तोरगाव नेहमी प्रमाणे गावालगत बकऱ्या चारण्यासाठी गेले असता अचानक सायंकाळी पाच वाजता दरम्यान आभाळात विजेचा कडकडाट झाला व बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या सुरेश व अश्विनी वर विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आहे.
यांची ब्रम्हपूरी पोलिसांना देण्यात आली.आणि अश्विनी दहावी वर्गात शिकत असल्याचे सांगितले जात आहे.कोविड १९ मुळे शाळा बंद असल्याने घरातील लोकांना हातभार व्हावा म्हणून अश्विनी बकऱ्या चारण्यासाठी जात होती.सुरेश रामटेके यांचा सुध्दा आप्तपरिवार असुन कर्ता पुरुष गेल्याने मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे.