काय सांगता! ‘या’ ठिकाणी मिळतंय चक्क 1 रुपया 46 पैसे प्रती लीटर पेट्रोल

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

काही वर्षांमध्ये इंधनांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनांच्या वाढत्या भावांमुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अनेक राज्यांमध्ये तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.

जगभरात पेट्रोल डिझेलच्या दर वेगवेगळे असतात. सध्या भारतात जरी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली असली तरी जगात असेही काही देश आहेत जिथे पेट्रोलचे भाव अगदी क्षुल्लक आहेत. जगात सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएला या देशात मिळतं. व्हेनेझुएला येथे पेट्रोल केवळ 1.46 रुपये प्रती लीटर आहे.

व्हेनेझुएला पाठोपाठ दुसऱ्या क्रमांंकावर इराण येथे सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. इराणमध्ये 4.24 रुपये प्रती लीटर पेट्रोल मिळतं. तर इराणनंतर स्वस्त पेट्रोलच्या बाबतीत अंगोला हा देश आहे. अंगोलामध्ये पेट्रोल 17.88 रुपये प्रति लीटर आहे. जगात व्हेनेझुएला, इराण आणि अंगोला हे असे तीन देश आहेत ज्या ठिकाणी सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं.

दरम्यान, भारतात इंधन दरवाढ हा एक राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. इंधन दरवाढीवरुन नेटकरी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. पेट्रोलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 60 टक्के कर आकारला जात आहे. तसेच डिझेलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 54 टक्के कर आकारला जात आहे. हे कर सरकारने कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर खाली येऊ शकतात.