घुग्घुस | नगरपरिषद ठरतेय दिगग्जनेत्यांना डोकेदुखी…

0
801
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा देण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी माहिती देताच घुग्घुस येथे नागरिकांनी एकच जल्लोष केला.
व लगेच नगरपरिषदेची अधिसूचना देखील जाहीर झाली यामुळे घुग्घुस जिल्हापरिषद सदस्या तसेच महिला बालकल्याण सभापती सौ. नितु विनोद चौधरी, पंचायत समिती उप सभापती निरीक्षण तांड्रॉ, पंचायत समिती सदस्या सौ. रंजीता पवन आगदारी यांचे पद धोक्यात आलेले आहे.
मात्र अधिसूचनेत नकोडा, महातारदेवी यांचा उल्लेख असल्यामुळे नकोडा मारडा क्षेत्राचे जीप सदस्य व माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे, पंचायत समिती सदस्या सविता ऋषि कोवे, यांना देखील घाम फुटला आहे.
घुग्घुस नगरपरिषदेची मागणी ही अत्यंत जुनी असून 2011 च्या जनगणने नुसार 32,767 इतकी लोकसंख्या होती.
त्यावेळेस गडचांदूर 25,167, चिमूर 15,770, नागभीड 25,167 पोंभुना 7,950, सिंदेवाही 14,157, गोंडपीपरी 8,774, जिवती 4,303,इतकी होती असे असतांना देखील प्रथम व जुनी ग्रामपंचायत असतांना देखील 2014 च्या दरम्यान 03 नगरपरिषद गडचांदूर, नागभीड, चिमूरची निर्मिती करण्यात आल्या तर जिवती, गोंडपीपरी, पोंभुरणा, सिंदेवाही या नगरपंचायत निर्माण करण्यात आल्या मात्र राजकिय सुविधेपोटी घुग्घुसकर जनतेला नगरपरिषद पासून वंचित ठेवण्यात आले.
आता मात्र नगरपरिषद घोषित होताच दिगग्ज नेत्यांना घाम फुटला आहे.