युवक काँग्रेसची पोलिस निरीक्षक रोशन यादव यांना निवेदनाद्वारे मागणी
ब्रम्हपुरी : ही शिक्षणाची नगरी म्हणून सर्वदूर परीचित आहे. त्यामुळे या ठिकाणी बाहेर तालुक्यातील व बाहेर जिल्ह्यातील विदयार्थी शिक्षणानिमीत्ताने येत असतात. परंतु ब्रम्हपुरी शहरात चरस, गांजा, अफिम, ड्रग्स ची विक्री होत असून यामुळे बरेच विदयार्थी व्यसनाधीन झाले असून याकडे पोलिस विभागाने लक्ष दयावे.
सोबतच शहरात जुगाराचे अड्डे चालत असुन घरफोडीचे सुध्दा प्रकार वाढले आहे. सोबतच ब्रम्हपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौक , शिवाजी महाराज चौक, व ख्रिस्तानंद विदयालयासमोर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात यावे. व ज्या दुकानांच्या समोर अस्ताव्यस्त स्थितीत वाहने उभी केली जातात ज्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो त्या दुकानदारांना निर्देश द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे युवक काँग्रेसच्या वतीने ब्रम्हपुरी येथील पोलिस निरीक्षक रोशन यादव यांना करण्यात आली.
सदर निवेदन देतांना युवक काँग्रेस ब्रम्हपुरी विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके, चैतन्य मेकर्तीवार, प्रतीक नरड, अनिकेत डांगे, अमीत नगराळे, प्रणव मेश्राम, वैष्णव मेश्राम, अभय बनपुरकर, अजय तलमले, निखील मेश्राम, नेखलेश नंदूरकर, श्रेयस जांभूळे, अमोल शेंडे, अभय दोनाडकर, अविष्कार आत्राम, सुरज भोयर, वैभव निशाने, चेतन बावनकुळे, शुभांगी मेश्राम, तनू बनकर यांची उपस्थिती होती.











