मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न 

0
449
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• संशयित आरोपी अजय सरकार यांचा पोलीसांवर
गंभीर आरोप
• अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागणार
• सरकार यांना जामीन मंजूर

चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मनोज अधिकारी हत्याकांडातील संशयित आरोपी म्हणून अपक्ष नगरसेवक अजय सरकार यांनी जामीन मिळताच पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे.
मनोज अधिकारी यांची हत्या 30 ऑक्टोबर ला सिनर्जी वर्ल्ड येथील राहत्या फ्लॅटवर हत्या करण्यात आली होती, हत्येनंतर आरोपी रवींद्र बैरागी याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये अजय सरकार, सीमा दाभरडे व धनंजय देबनाथ यांची नावे बैरागी ने घेतले त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत अजय सरकार व धनंजय देबनाथ यांना पोलिसांनी अटक केली, तब्बल 3 महिन्यांनी सीमा दाभरडेला अटक करण्यात आली.
मात्र जानेवारीला तिघांची जामीनावर सुटका करण्यात आली, आज अपक्ष नगरसेवक अजय सरकार यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करीत मला हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी गोवण्याचा प्रयत्न केला, घटनेच्या दिवशी मी पदमापूर येथे होतो, माझ्या मोबाईल लोकेशनवर त्याची पूर्ण माहिती पोलिसांना मिळाली होती, घटना ज्यादिवशी घडली नेमकं तेव्हाच पोलीस प्रशासनाने कोणतंही कारण न सांगता मला अटक केली व काही कागदपत्रावर सही सुद्धा घेण्यात आली असे अपक्ष नगरसेवक अजय सरकार यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.

पोलीस प्रशासनाने मला फसवले मी यावर न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सरकार यांनी दिली असून जेव्हा जनप्रतिनिधी वर पोलीस याप्रकारे दडपण आणत असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा थेट आरोप सरकार यांनी पोलीस प्रशासनावर केला आहे.