घुग्घुस : कोरोना काळात विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या कोविड योद्धा तसेच घरात राहून कोरोना काळात आपल्या कुटुंबाची धैर्याने जवाबदारी सांभाळणाऱ्या मातृशक्तीचा गौरव करण्यासाठी महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर, युवक काँग्रेस महिला सरचिटणीस शिवानीताई विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते दिनांक 13 फेब्रुवारी रोजी घुग्घुस येथे सत्कार कार्यक्रम व हळद कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्व तैयारी करीता आज महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, रोशन पचारे (किसान सेल जिल्हाध्यक्ष) पवन आगदारी (अनुसूचित जाती विभाग सेल जिल्हाध्यक्ष), सैय्यद अनवर कामगार नेते, सुरज कन्नूर तौफिक शेख युवक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.
यामध्ये सौ.रंजना आगदारी माजी, पंचायत समिती सदस्य,सौ.पद्मा राजुरेड्डी, सौ.अलका पचारे, सौ.विजया बंडीवार,सौ.संगीता बोबडे,सौ.गीताताई सोदारी,सौ. वैशाली तंगड्पल्ली, सरस्वती पाटील, सौ.यास्मिन सैय्यद,सौ.पदमा त्रिवेणी,सौ.संध्या कन्नूरी,
सौ.वंदना हिकरे, श्रीमती अमिना बेगम शेख, सौ. अर्चना सारोकर, सौ. कविता ठाकरे, श्रीमती वंदना क्षीरसागर, सौ. पुष्पा नक्षीणे, सौ.पदमा कोंडय्या तलारी,सौ.प्रीती छत्रीवार,सौ.माधुरी ठाकरे,सौ.मंगला बुरांडे,अनिता मेकल,सौ.वनिता रुद्रारप सौ.विजया गुडला, सौ.अरुणा गोगला, सौ.अनुसया सुरम, सुंदराबाई किण्णाके,सौ.आम्रपाली वानखेडे,सौ.मीना कार्लेकर,सौ.रेखा रेंगुंडवार,सौ.चंदा दुर्गे,सौ.सुनीता राखूनडे,सौ.मीना माणुसमारे,सौ.चांदनी माणूसमारे,सौ.अनिता मुंढे,सौ.कविता ठाकरे,राधाबाई गोगला,संयुक्ता कोंडरा,सौ.सरिता गौरकार,
सौ.सपना पालेवार,सौ.सरिता श्रीमुला,सौ.ममता गोगला व मोठ्या संख्येने महिला पदाधीकारी तसेच सिनू गुडला, बालकिशन कुळसंगे, कुमार रुद्रारप,व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.