रक्ताच्या पत्रातून “सेव रामाळा, सेव चंद्रपूर” चा संदेश

0
125
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

• रामाळा संवर्धनासाठी ३६ आंदोलकांनी रक्ताने लिहिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

• इको प्रो चे अन्नत्याग आणि साखळी उपोषण सुरूच

चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ इकोप्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहात आज गुरुवारी (४ मार्च २०२१) ला अकराव्या दिवशी ३६ आंदोलकांनी स्वतःच्या रक्ताने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रामाला तलाव प्रदूषण मुक्त करण्यासाठी लक्ष वेधून घेतले आहे. इको प्रो चा अध्यक्ष बंडू धोतरे यांची प्रकृती बिघडल्यानंतर धर्मेंद्र लुनावत यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा तिसरा दिवस आहे. आज साखळी उपोषणास नितीन रामटेके, राहुल कुचनकर, सचिन धोतरे, अमोल उत्तलवार, भारती शिंदे यांनी केले.

चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव जलप्रदूषण चिंतेची बाब झाली आहे. तलावातील घातक प्रदूषित घटक भूजल प्रदूषित करित असल्याने परिसरातील नागरिकांना बाधा होत आहे. करिता पर्यावरणाचे संतुलन राखण्यास अस्तित्वास असलेल्या जलस्त्रोताचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी रामाळा तलावाचे संवर्धन खनिज विकास निधीतून करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. खासगी वैद्यकीय तज्ज्ञाच्या उपस्थितीत आज गुरूवारी रामाळा तलावाचे काठावर ३६ आंदोलकांनी स्वतःचे रक्त संकलित केले. त्यांनतर कोऱ्या कागदावर रक्ताने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना पत्र लिहण्यात आले. या पत्राद्वारे रामाळाचे संवर्धन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अकरा दिवसापासून आंदोलन सुरू असतानाही स्थानिक प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिक या आंदोलनात सहभागी होवून याला लोकचळवळीचे स्वरूप पदेत आहेत. आजच्या अनोख्या आंदोलनात तरुण, तरुणी आणि ज्येष्ठ महिलानी सहभाग घेतला. आणि “सेव रामाळा, सेव चंद्रपूर” असा संदेश देत इको प्रो ने केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.