राज्यपालांनी स्वीकारला वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

0
179
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

मुंबई : पाच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला. राठोड यांनी 28 फेब्रुवारीला आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरे हे मंत्री संजय राठोड यांचा राजीनाम्यावर सही करत नाहीत, असा आरोप भारतीय जनता पार्टीकडून लावण्यात येत होता. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला. संजय राठोड यांनी आपला राजीनामा दिला नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराच भाजपाकडून राज्य सरकारला देण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट

28 तारखेला दुपारी चारच्या दरम्यान संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला‌ होता. त्यानंतर मुख्यमंत्री असल्याकारणाने वनमंत्री खात्याचे काम आपल्याकडे असेल, असेही सांगितले होते.