त्यांनी’ दिला जागेचा ‘आधार: शुरू झाला ‘प्रार्थना ‘ झुणका भाकराचा रोजगार

0
227
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : घुग्घुस येथील प्रार्थना महिला बचतगट हे स्वयंम रोजगाराच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांना झुणका भाकर केंद्रा साठी मौक्याची जागाच मिळेना शेवटी हतबल झालेल्या भगिनीची समस्या राजुरेड्डी यांच्या कानापर्यंत गेली असता रेड्डी यांनी बस स्थानक परिसरातील पाणी कटंकी जवळील आपल्या मालकीची जमीन महिलांना झुणका भाकर केंद्रासाठी निःशुल्क उपलब्ध करून दिली.

बुधवारी प्रार्थना बचतगटा तर्फे झुणका भाकर केंद्राला सुरुवात झाली. झुणका भाकर केंद्राचे उदघाटन काँग्रेस नेते राजुरेड्डी, रोशन पचारे, पवन आगदारी, मनीष सर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर बचत गटाला नाबार्ड तर्फे अर्थसहाय्य करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात आई – बहिणीनी कुटुंबाला आर्थिकबळ देण्यासाठी पुढे येणे हे काळाची गरज असून झुणका भाकर केंद्राला घुग्घुस येथील नागरिकांनी अवश्य भेट द्यावी अशी विनंती उपस्थित नेत्यांनी केली.

याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ.रंजिता आगदारी, सैय्यद अनवर,ज्योती गोमासे, श्यामला गड्डेवार, सुशीला निचकोला,ललिता अट्टेला,सोनी गोदारी,अरुणा कापे,आरती आगदारी, सौ.पद्मा त्रिवेणी, नौशाद शेख, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, व अन्य मान्यवर उपस्थित होते.