चंद्रपूर : कोरोना संकट काळात ऑक्सीजन च्या तुटवड्याचे चित्र सर्वत्र चंद्रपूर जिल्हयात असतांना राजुरा उप जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन च्या कमतरतेची वस्तुस्थिती आज राजुरा तालुक्यातील भाजप च्या वरिष्ठ नेत्यांनी व कार्यकर्त्यानी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या लक्षात आणून देताच अहीर यांनी वेकोलि बल्लारपुर क्षेत्राच्या माध्यमातून राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कुळमेथे व त्यांच्या वैद्यकीय चमुला १० ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले.
यावेळी माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, वाघुजी गेडाम, सतीश धोटे, प्रशांत घरोटे, सचिन डोहे, कैलाश कार्लेकर, प्रशांत साळवे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोरोना संसर्गाचा जिल्हयात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाजप च्या प्रत्येक कार्यकर्त्यानी सेवाभावानी रुग्ण व त्यांच्या परिवाराची काळजी घ्यावी. कुठल्याही रुग्णालयात कुठलिही कमतरता अथवा रुग्ण सेवेची गरज असल्यास थेट संपर्क साधन्याचे आवाहन यावेळी हंसराज अहीर यांनी केले आहे. राजुरा येथील उपरुग्णालयाला लवकरच ऑक्सीजन कोंसंट्रेटर उपलब्ध होणार असल्याची महिती यावेळी अहीर यांनी दिली.